प्रामुख्याने खेड्यापाड्यातून शेरसिटीला धावणाऱ्या माणसांना घेऊन तमाम महाराष्ट्रभर धावणाऱ्या लालपरीने संप केलाय। आंदोलन कोणतेही असुद्या किंवा त्याचे नेतृत्व कुणीही करू द्या। जर सामान्यांच्या हितासाठी अन कल्याणासाठी असेल तर बिनशर्त आपण त्याचे समर्थन करायला हवंय। सरकार लालपरी तोट्यात आज म्हणून 7 वा वेतन आयोग लागू करत नाही। गळके डबे घेऊन भिकार व्यवस्थेला दोष न देता बिनदिक्कत अन जिवाच्या आकांताने कर्मचारी लाखो प्रवाशांना वाहून सुखरूप पोहोचवतात। सरकार भाजपाचे आहे म्हणून हे आंदोलन चुकीचे आहे म्हणणाऱ्यातला मी तर नाही। 8/9 हजारांची तोडकी रक्कम कुण्या सरकारी कर्मचाऱ्याला आहे? जोखमीचे काम करून कोणतीही सक्षम व्यवस्था प्रशासन देऊ शकत नाही आणि पुरेसा पगारही देऊ शकत नाही यापेक्षा दुसरं काय दुर्दैव असणार..?
आज सणासुदीच्या दिवशी संप केला त्यातुन प्रवाशांचे हाल झाले म्हणून डांगोरा पिटताना खाली मान घालून व्यवस्थेला चकार शब्दही न बोलणाऱ्यांना न्याय मिळतच नाही हे जाणलं पाहिजे।
सदर खात्याचे मंत्री शिवसेनेचे आहेत म्हणून अडचणीत आणण्याचा डाव अजिबात नाही। मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यायला हवाय। हे असेच सुरू राहिले तर कर्मचाऱ्यांना जनता ठोकून काढेल हे महसूलमंत्री श्री. चंद्रकांत दादांनी सांगितलं म्हणे । एखाद्या आंदोलनाला अशा पद्धतीने उत्तर द्यावे हे राज्यकर्ते म्हणून अजिबात योग्य नाही। सरकारला अडचणीत आणण्यासाठी जर हे आंदोलन असेल तर सत्य वेगळे आहे की वास्तव हे सरकारने समोर आणायला किंवा त्यामध्ये सरकारची भूमिका बजावणाऱ्या विचारवंतांची समोर आणायला हरकत नाही।
एस. टी. कात टाकतेय म्हणत आम्ही वाय-फाय सुविधेचे स्वागत केले असे बदल होत असतील तर स्वागहार्य आहे। एकीकडे लालपरी गाळात आहे म्हणून पगारवाढ होत नाही, सुविधा मिळत नाहीत म्हणताना गेली कित्येक वर्षे हे सुधारण्यास तत्सम व्यवस्था पुढाकार का घेताना दिसून येत नाही हेही समोर आलं पाहिजे। कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यावर काढून टाकले जाईल असा धमकी वजा हुकूम जर कुणी काढणार असेल तर पाय खोलात पडतोय हे लक्षात घ्यायला हवंय।
आंदोलन कुणी केलं हे महत्त्वाचं नाही। ज्या गोष्टीसाठी केलं हेच या क्षणाला महत्वाचं आहे। आज-उद्या पुन्हा लालपरी रस्त्यावर येईल आणि सरकार मोठ्या जोमाने एसटी सक्षम करण्यासाठी सरसावेल ही अपेक्षा।
© विकास विठोबा वाघमारे
📲 8379977650

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा