😉आम्ही ठरवू ते आरोपी. आम्ही सांगू ते वाईट, आम्ही बोलू ते पूर्व. आम्ही सांगू ते सत्य. अशी भाषा हल्ली बोलू लागलेत नक्षलवादी प्रवृत्ती जोपासणारे नेते. मुळात मला बातमी वाचल्यानंतर थोडं चलबिचल झालं “भिडे, एकबोटेना अटक न झाल्यास पुन्हा हिंसाचार”.
आम्ही दंगल घडवलीच नाही. दंगल ही हिंदुत्ववाद्यांनी घडवली आणि तेही आम्ही जी नावे सांगतो त्यांनीच घडवली अशी कुबाड रचत मागच्या रांगेतून पुढ येऊन तथाकथित दलितांचा नेता होऊ पाहणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना आपण काय बोलतोय याचं भान राहिलेलं दिसत नाही किंवा सत्य सांगताहेत.
जर तुम्ही दंगल घडवलीच नसेल, तुमचा त्यात हातच नसेल, यल्गार सभेतील सर्व तथाकथित मान्यवर (?) जर धुतल्या तांदळाचे असतील तर “पुन्हा” शब्दाचा अर्थ काय होतो हे एकदा या महाराष्ट्रातील भोळ्या भाबड्या जनतेला सांगा. जर दलितांचा नेता व्हायचं असेल तर बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक होऊन समृद्ध आणि सुसंस्कारित समाज घडवण्याची शपथ घ्या. सामाजिक कलह निर्माण करून नेता होता येत नसतं. ते म्हणजे तीन काठ्यावर एक मडकं ५ – ६ फुट उंचीवर उभं करून खाली जाळ घालून शिजण्याची वाट बघण्यासारखं आहे. ते शिजतही नाही आणि भिजतही नाही. तो जाळ वाऱ्याने रानभर पसरतो आणि मग अंगलोट येतो काळसर धूर.... हे चपखल ध्यानात घ्या.
पुन्हा हिंसाचार करू म्हणजे पूर्वीही आम्हीच केला, आताही अजून करू असा सरळ, साधा, सोपा अर्थ होतो. तमाम दलितांना आणि जनसामान्य जनतेला गृहीत धरू नका. कायदेशीर कारवाई झाली तर चौकशी होईलच. तुम्ही मागणी करणं बरोबर आहे मात्र अशी विधानं करून पुन्हा समाज चेतवण्याचा प्रयत्न नका करू, ते आंबेडकर आडनावाला शोभणारं नाही.

_ विकास वाघमारे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा