माणूस फक्त आपलं हित जपत आलेला म्हणजे लोभनिय प्राणी.पृथ्वीवर जगायला अन्न, वस्त्र,निवारा या गोष्टी गरजेच्या आहेत. पण अलीकडे माणसांची जगण्याची पद्धत बदलली म्हणजे हायटेक झाली.मग प्रत्येक गोष्ट हातात येऊ लागली.शेत-शिवार फक्त स्वप्नात येऊ लागलं.मातीशी जोडलेली नाळ सहज पणे तुटून गेली केवळ या आमच्या हायटेक जगण्याच्या लोभापायी.सिमेंटच्या जंगलात मात्र लोकसंख्या झपाट्यानं वाढत गेली आणि आमच्या शहराची लांबी वाढत गेली.यासाठी साहजिकच अनेक वृक्ष तोडीची नामुष्की आमच्यावर ओढवली.एके काळी आमच्या बांधावर आवडीने लावलेली झाडे आज हायटेक च्या वेडापायी आम्हीच तोडून टाकली.मग शेत-शिवार कोरडं पडत गेलं,दुष्काळच सावट हळूहळू सर्वत्र पसरलं आम्ही आजपर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.पण आज पिण्याच्या पाण्याची चिंता आमच्या मनामनाला सतावतेय.
या सर्व गोष्टीचा विचार करून आता "महाराष्ट्र सरकार" ने 1 जुलै रोजी 2 कोटी वृक्षलागवड करण्याचा मानस ठेऊन सर्व यंत्रणा सतर्क केली.हे सरकार ने केलेली पर्यावरण क्षेत्रातील सर्वात मोठी कामगिरी असच म्हणावं लागेल.कारण 2 कोटी वृक्ष हे समाजातील सर्व घटकांना सामावून घेत चळवळ उभी करण सोप नाही.
यासाठी सरकारच्या महत्वकांक्षी योजनेला खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत पोहचवण्याचा दृष्टीने अनेक पर्यावरण व निसर्ग प्रेमी संघटना खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आखत आहेत. लोखोंच्या संख्येनं वृक्षलागवड करून त्याची जपणूक करण्यासाठी अहोरात्र मेहनत सुरु आहे.
आपणही आपल्या पुढील उज्वल भविष्यासाठी प्रत्येकांनी वृक्षलागवड करण्यासाठी योगदान द्यावं.तर महाराष्ट्र नंबर एक व्हायला वेळ लागणार नाही.लवकरच सर्वांच्या सहकार्याने "हरित महाराष्ट्र" आपल्याला पहायला मिळेल.मग आता एकच लक्ष्य,दोन कोटी वृक्ष.
©विकास वाघमारे (वाघोलीकर)
📲8379977650

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा