"शाळेत या शाळेत..... डाव खेळू! येताना राज्याला अन परश्याला बी घिऊन यी...."।
ही अशी आरोळी साधारण एप्रिलच्या शेवटी अन मे पूर्ण दररोज दुपारच्या प्रहरी यायची अन मग थेट शाळा गाठायची। रखरखत्या उन्हात पळत जाऊन पाल हातरुन शाळेत बसायचं आणि मग डाव वगैरे सुरू व्हायचा।
त्या डावात कुणीही बसायचं म्हणजे बाप, लेक, चुलता, शेजारी, दोस्त पाहुणा वगैरे वगैरे....
सर्व नाती विसरून रंगलेला डाव। कुणाचा तरी बाप हातात फोक घेऊन आला की डळमळीत व्हायचा।
"माकडा, काय करतुय हितं किती हाका मारल्या, ओ द्याला तोंड नाही काय। तू घरी चल बगतू तुला.." वगैरे म्हणत। ते पोरं तोंड कसं तरी करून दूर पळायचं।
त्या पोराच्या जागी मग तो बोलवायला आलेला बापच बसायचा. असा खेळ।
डाव खेळणं हे काय पाप नव्हतं। मेंढीकोट, पाच-तीन-दोन वगैरे खेळायचो। उन्हाच्या तावडीतून बाया एकपार्गी कामावरून यायच्या धापा टाकत। डोक्यावर गवताचं ओझं..... धापकन खाली टाकून त्यालाच रेलून 10 -5 मिनिटं बसायच्या। एका दमात तांब्या रिकामा करून मग भाकर तुकडा...
गॅरगॅरवाला टंग•~~ टंग ~~~टंग~` टंग~~~ घंटी वाजवत यायचा तेव्हा संत्राच्या बाटल्या गोळा करून एखादं गॅरगॅर मिळावायचं।
डाव खेळताना भांडण ठरलेलं असायचं। मग कोण पाव्हना बाजूला असेल तर "पाव्हणं, तुम्ही बसा, ह्यला काय येत नाय, पाव्हना आलाय गावावरनं द्या की लगानू, उठ रं तू..." म्हणत चिडणाऱ्या गड्याची विकेट काढायची।
ज्याचा डाव असेल त्याला डिमांड बक्कळ। नाहीतर त्याचं "माजामाजा डाव द्या मी जातू घरी" हे ठरलेलं। बाकी माणसांना न परवडणारं...
शाळेच्या व्हरांड्यात दिवसभर हा असा माहोल कोणत्याही ठिकाणी केवळ गावातच बघायला मिळतो।
4 वाजल्या, जनावरं यायची वेळ झाली की डाव मोडून मग घराकडं मार्गस्थ व्हायचं बिनकामाची माणसं तिथेच झोपायची।
रोज असा डाव... रोज अशी भारलेली दुपार... रोज नवा जोश... आता सगळंच बदललं । डाव आणि दुपार आहे तशीच केवळ त्या गावात... त्या शाळेत अन त्या माणसात। मी मार्गस्थ झालोय नव्या शहरात... नव्या माणसात.... नव्या दिशेनं...........! जून्या गावाला नवंपन देण्यासाठी.....!!!
#खेड्यामातीच्या_आठवणी_या_माझ्याच_डायरीतून
© Vikas Waghamare
📱 8379977650
वाघोली ता. मोहोळ जि. सोलापूर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा