गोष्ट साधारण एक महिन्यापूर्वीची आहे. ठाणे स्टेशनवरून मी सोलापूरला रात्रीची सिद्धेश्वर पकडली. प्रचंड गर्दी होती त्यामुळे उभंच रहावं लागलं. कल्याण पर्यंत एका पायावर वगैरे थांबून गेलो आणि मग खाली बसण्याऐवढी जागा झाली. डोक्याचे केस विचित्र वाढलेले, दाढीला कधी तरी वस्तारा लावलेला असेल. अंगावरचा चेक्सचा शर्ट आणि जीन्स गुडघ्यांवर फाटलेली आणि पांढरा फुपाटा भरलेला असा वरवरचा पेहराव असलेला एक तरुण माझ्या समोर उभा होता. जागा झाली तेव्हा मटकन खाली बसला मग मीही मांडी घालून समोरच बसलो.
भाई, कहा जा रहे हो? - मी जरा कुचंबत अर्धवट हिंदी बोललो.
पूना जाना हैं। आप? बिहारी टोनिंग धावत्या शैलीत बोलून मोकळा झाला.
मैं सोलापूर, आपका नाम? - पुन्हा मी।
संदेसकुमार. क्या हुवा?
कुछ नहीं भाई। पूना किस लिये जा रहे हो? मी आगाऊ प्रश्न विचारला।
हमरा साब हैं न वहा। साईड सुरू हैं।
हं, आप कहा से हो? मी
बिहार से, लेकिन अब पूना, बंबय घुमते रहते हैं।
अशाच गप्पा रेल्वेत खाली फतकल मांडून आम्ही बोलत होतो. मग पुढे बेकारी, बेरोजगार, भ्रष्टाचार, राजकारण, व्यवसाय, महागाई आणि स्थानिक व्यवस्था असं सगळं मी जाणून घेतलं।
23-24 वयाचा एक तरुण मात्र त्यांच्यामध्ये जोश, उत्साह, सळसळतापणा, कर्तृत्ववान, स्वाभिमान वगैरे काहीच उरलेलं मला जाणवलं नाही। पण त्या प्रवासात बिहारचं वैराण अन जळजळीत वास्तव ऐकून जीवाला वाईट वाटण्याशिवाय पर्याय नव्हता।
भाऊ, मी इकडे मुंबईला 19 व्या वर्षी आलो. टाईल फरश्या बसवायला शिकलो आणि मग हळूहळू काम मिळू लागलं। आमचा ठेकेदार असतोरोज आम्हाला 160 रुपये देतो। आम्ही व्यक्तिगत काम केलं तर पैसे जास्त मिळतील पण जीवाला प्रचंड धोका आहे। हाताने करून खायचं, वर्षातून एकदा बिहारला जातो, महिन्याला सगळं जाऊन 3 हजार हातात राहतात। व्यसन लागलं त्याला वेगळाच खर्च येतो। बिहारला राहून तिथेच छोटमोठं काम का करत नाहीस? यावर म्हणाला गेल्यावर्षी असाच विचार करून गेलो, 7 महिने घरीच बसलो, एकदाही काम नाही मिळालं, गावात साधी लाईटसुद्धा नाही इंडस्ट्री तर जवळपास अजिबात नाही, मोठा भाऊ आहे गाड्यांचे पंक्चर काढतो। आई बाप म्हातारे झाले। इकडे आम्ही गावातील 600 पेक्षा जास्त तरुण आलोय। गावाची लोकसंख्या 13 हजारच्या आसपास असेल म्हणाला। पण गावात खूप कमी लोक राहतात सगळ्यांनी बिहार सोडलंय। लालूसाहेब कोण माहीत नाही बोलला, मोदी माहितेयत। आमच्या इथे आमदार नाही म्हणाला, (त्याला काहीच देणंघेणं नव्हतं)। किती दिवस हे काम करणार तर म्हणाला भाई, जिंदगीभर तो करना ही पडेगा, मैं भी गांव जा के ऐशोआराम जिंदगी जीना चाहता हूँ। पर जिंदगी का गाड़ा कैसा चलेगा? हमे सुबह का खाना हमेशा सपनो में आता हैं। पूरा देस मोदी कहता हैं पर मैं खाली पेट किसका नाम लूँ? यहां बम्बई में आया पहला बहोत लोगों ने काम का पैसा डुबाया। जवाब मांगा तो उन्होंने गालियां सुनाई. मैं तो परप्रांतीय हूँ। जो संभाल लेते हैं और जितना पैसा देते उनका काम करता बस्स। यही जिंदगी भैय्या लोगोंकी हैं दोस्त। जीने की तलाश में आज बम्बई, कल पूना परसों पता नहीं।
पुन्हा पुन्हा नवनिर्माणाची व्यापक व्याख्या आणि राष्ट्र परिवर्तनाच्या असंख्य व्हावटळांनी मेंदूला घेरलं होतं। एक भैय्या आणि मी बिहार, रोजगार, भविष्य आणि फरपट बस्स इतकंच त्या क्षणाला भिनलं। लालूंनी चारा खाल्ला, यादवी पिलावळींना मोहमाया आणि खुर्च्या दिल्या, नितीशकुमारांनी समाजवाद्यांचे राजकारण केलं। चूक कुणाचीच नाही। समाज निरक्षर राहिला न त्याचा हा परिणाम असतो। एव्हाना पुणे आलं तो हात मिळवून मिलेंगे म्हणत निघून गेला अन मला त्याचं ते वाक्य छळू लागलं, " पुरा देस मोदी कहता हैं, पर मैं खाली पेट किसका नाम लूँ?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा