मंगळवार, ११ एप्रिल, २०१७

#रविवार_स्पेशल😎😍😘🎉

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शिक्षणाच्या निमित्तानं शहरात आलो अन गावातल्या खाणाखुणा थोड्याशा धूसर होत गेल्या.

गावानं दिलेली आठवणींची ओंजळ घेऊन जगभर हुंदडलं तरी त्या ओंजळीतला सुगंध कमी होत नाही. आपलं गाव आपल्याला जीवापाड प्यारं असतं पण कधीतरी त्या गावाला सोडून दुरदेशीच्या सिमेंटच्या जंगलात जावंच लागतं.

बबन्या काका म्हणायचा न "गाव सोडल्याबिगर परगती होत न्हाय, मी लिहून दीतू।"

मी कधी खरंखोटं पाहत बसलो नाही. पण देवानं ज्या दिशा अन सोबत माणसं दिली जीवाला जीव देणारी. त्यांच्या सोबत पुढे सरकत राहिलो. शहरात आलो म्हणून गावाला विसरलो नाही. पण गावातलं गावपण या शहरात सतत मनात पिंगा घालत राहतं. यातून ओठावर आलं हे....

         ______/\_______
शहर सारे मुके इथे हरवली भाषा,
कशी माणसे हि, कशी भाग्य रेषा।

इथे कुठे ती मुकी वासरे अन गायी,
नसे गात भूपाळी, गाय हंबरत नाही।

© Vikas Waghamare
सोलापूर
__________।।_________________________।।__________

PC- Google

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा