शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

लाल सलाम चा तिसरा डोळा....!


  खूप दिवसांनी लिहावसं वाटतंय म्हणून लिहितोय, ज्यांना लेख आवडेल त्यांनी अवश्य पुढे पाठवा, प्रतिक्रिया द्या. यामध्ये काहीही बदल करू नये हि विनंती.बाकी सर्व ठीक आहे.तुम्हासर्वांना सस्नेह जय भीम....
      .....तर विषय असा होता कि आताचे दलितांचे तळमळीचे बेगडी नेते कन्हैय्या कुमार याने आझादी हवी म्हणून हलकल्लोळ केला. देशविरोधी घोषणा दिल्या. अन मग खाक्या दाखवल्या तेव्हा समजल कि आपण काय बोललो...? नंतर आपलं टेंडर  अडचणीत आहे म्हणून लगेच राहुलजी गांधी अन मा. केजरीवाल त्यांना आधार द्यायला गेले. मग पुढे काय झालं माहितीय तुम्हाला ते सर्वच....मग नंतर तथाकथित पुरोगामी (ज्यांना पुरोगामी या शब्दाचा अर्थहि माहित नाही.) जे राष्ट्रीय  स्वयंसेवक संघ (RSS) यांच्या कट्टर विरोधी आहेत ते लगेच कन्हैय्याच्या पायथ्याशी धावत पळत जाऊन बसले. अन उसने अवसान आणावे यासाठी ओढाताण सुरु झाली. नंतर नंतर पुरोगामी कपडे कमी पडतायेत हे लक्षात येताच मग दलित समाज आपल्याकडे यावा या उद्देशाने नवीन ट्रेंड (केविलवाणी धडपड) या कम्युनिष्ट नेत्यांनी काढला. कायतर म्हणे जय भीम-लाल सलाम.. काय डोकं लावलं ना त्यांनी...? ज्यांना सुचले त्याचे अभिनंदन ...
      या लाल सलाम अन जय भीमचा एकमेकांशी काडीमात्र हि संबंध नाही.एकीकडे डॉ. बाबासाहेबांना आदर्श मानणारे आम्ही दलित त्यांचे विचार समजून घेत नाही.मरण्याच्या ३ महिने अगोदर काठमांडूमध्ये बाबासाहेब म्हणाले होते कि "जोपर्यंत माझे अन बुद्धांचे विचार या देशात आहेत तोपर्यंत या कम्युनिष्टाना थारा देऊ नका. ठेचून काढा."  मग आम्ही कोणत्या विचाराने लाल सलामला भिक घालतोय..? याचे नवल वाटते.
    कसं असते कि वाघासोबत कितीही कुटुंबासारखे राहायचे ठरवले तरी भूक लागली कि तो आपल्याला फाडून खाणार हे नक्की. कारण त्याचा तो धर्म आहे. तसाच या आमच्या दलित बांधवांचे झाले. जय भीम-लाल सलाम म्हणत आम्ही कम्युनिष्ट छताखाली गेलो खरे पण १४ एप्रिल ला परवा गडचिरोलीच्या छल्लेवाडा इथे डॉ. बाबासाहेबांच्या जयंती सोहळ्यावर त्यांचीच ढालकरून दलित बांधवावर नक्षलवाद्यांनी अंधाधुंध गोळीबार केला.
  त्यामध्ये हवालदार नानाजी नागोसे यांचा मृत्यू (तसा खूनच)  झाला. कित्येक जखमी झाले. हे म्हणजे कसं .."मांडीवर घेऊन केसाने गळा कापल्या सारखेच झाले. एकीकडे कन्हैय्या व कम्युनिष्ट नेते जय भीम-लाल सलाम म्हणतात अन दुसरीकडे  तशाच कार्यक्रमात त्यांचीच पिल्ले म्हणजे "लाल सलाम हा जय भिमवर हल्ला करतो". बेछुट गोळीबार करतो याचा अर्थ दलित बांधवानी वेळीच जाणला पाहिजे.
   हे सर्व झाले तरी एकही कम्युनिष्ट, पुरोगामी नेत्याने त्याबद्दल टूकार शब्दही काढला नाही याचे फार काही नवल वाटत नाही. कारण लाल सलाम वाले जय भीमवर हल्ला करून थोडे का होईना पण त्यांचे खरे ध्येय दाखवून दिले आहे.
   असो, आता गरज आहे विचार करण्याची कारण लाल सलाम वाल्यांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर हि दलितांवर तीक्ष्ण आहे. हे प्रेम १०००%  बेगडी आहे हेच परवाच्या प्रकरणावरून लक्षात येते..
 जय हिंद..जय भीम...भारत माता कि जय...
(हे विदारक सत्य समोर येण्यासाठी पुढे पाठवा.)                                                  
 लेखक :- विकास वाघमारे
            सोलापूर.
            8379977650

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा