मंगळवार, १८ एप्रिल, २०१७

#रविवार_स्पेशल🎻🎊🎊🎉😀🎊✨✨
   
      ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तुमच्या शहरात बघा कसा घाईघोंधळ असतो असं मी सतत लहानपणी दुसऱ्यांना म्हणायचो। अन आता...

         आजचा दिवस निवांत वगैरे समजून अंथरुणात उशिरापर्यंत लोळत पडलेला मी. खरंतर तुमच्या या शहरात केवळ मीच असा असेल रविवार वगैरे सुट्टीचा समजणारा पण असो मी गर्भश्रीमंत असतो बरं त्याविचारांनी।

दररोज तुमचं शहर लाखो पट वेगाने धावताना मी पाहिलंय। जॉब, व्यवसाय, पॉश लाईफ, BHK मजले, वगैरे वगैरे लखलाभ अशी तुमची स्वप्न हे सर्व तुम्हाला करायला लावतात।

माझ्या कुण्या मूलखाच्या गावात असं काहीच घडत नाही. हां, पण तेही जगतात बरं अगदी ऐशआरामात। या शहरातले बडे बडे लोक्स येतात न हवा वगैरे खायला।

तर एव्हाना 8 वगैरे वाजल्याचा भास होतो म्हणून उठून खिडकीत धाव घेतो सारं चिडीचूप। तुमच्या मोबाईल कंपन्या हल्ली किती स्वस्त पॅकेज देताहेत, पण बोलणं स्वस्त नाही होत आजकाल। लाखोंचा पॅकेज मारता येईल पण समोर बोलल्याची गंम्मत कुठे खरेदी करता येत असते का?

जेव्हा नसते काही जवळ तेव्हा अशा ओळी माझ्या मनाचा ताबा घेतात, "मी ना त्यांना रोखू शकतो ना त्या भावनांना......!"

तुटतो श्वास तेव्हा रिते आभाळ होते,
चांदणं नाहल्या जीवाची तेव्हा तळमळ होते।

मी झुरतो सारा गुपचूप मनात माझ्या,
तेव्हा हताश सारे स्वप्नही रक्तबंबाळ होते।

© Vikas Waghamare
📱 8379977650
Solapur
     

--------------------------------💐💐💐------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा