गुरुवार, २० एप्रिल, २०१७

सलाम बच्चू भाऊ- जगावेगळा आमदार🎊🎊👏😘

एकीकडे महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी म्हणून महाराष्ट्रात संघर्षयात्रा निघत आहे मात्र समस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन महाराष्ट्राचा एकमेव अपक्ष आमदार बच्चू कडू आसूड यात्रा काढत आहेत।

मुख्यमंत्र्यांच्या घरापासून ते पंतप्रधानांच्या घरापर्यंत ही आसूडयात्रा सुरू केली आहे.

मला अभिमान वाटतो या बच्चू भाऊंचा एकमेव आमदार तोही अपक्ष आणि समस्त शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी, होणाऱ्या लुटीसाठी जिवाची पर्वा न करता दगडधोंड्याचा रस्ता, निवासाची तोकडी व्यवस्था अशा स्थितीत शेतकऱ्यांचा पहारेकरी होऊन सोबत लढा देत आहेत.

 केंद्रात, राज्यात सरकार कुणाचेही असो मात्र आंदोलन करण्याची धमक व वृत्ती मला आपलीशी वाटते कारण झगडल्याशिवाय मिळत नाही हे सत्य आहे।

आज गुजरात राज्यात बच्चू भाऊंची ही आसूड यात्रा प्रवेश करतेवेळी 5 हजारांपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त तैनात करून आंदोलन रोखण्याचा डाव खेळला।

हजारो शेतकऱ्यांना अटक केली आहे मात्र मागे हटणारा हा नेता नाही, गांधीगिरी अडवत असाल तर भागतसिंगगिरी करू असा इशारासुद्धा दिलाय।

महाराष्ट्राचा एक आमदार हे करू शकतो आणि गरज आहे। बच्चू भाऊ मनापासून सलाम.....

कुणाच्या आहेत माहिती नाही मात्र या ओळी आठवल्या तुमचं जे सारं पाहताना.....

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं,
ये सुरज बदलनी चाहिये,
तेरे सिने में नहीं तो मेरे सिने में,
हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिये।

© Vikas Waghamare
Solapur








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा