#धीर_मिळतो_तेव्हा_कुठे....!☺😊🤘😍😘🎊🎉
---------------------------------------------------------------------------
दिवस बरा असतो. हिंडणारी फिरणारी माणसं दिसतात आजूबाजूला. ती बोलत असुदे किंवा नसुदे.
दिवस ढासळत जातो कलाकलानं तेव्हा खूप मोठं दुःख मनात येतं. रात्र सावरण्याचे मोठं काम करायला लागतं. मग त्यात आठवण बिठवन सगळं सगळंच आलं।
पार्कात उभं राहून आजूबाजूला पाहतो, कुठे काच कंदील, दिवा बत्तीचा मागमूस वगैरे नसतोच। आणि कसा असेल हे तर हायफाय शहर आहे न प्रतिष्ठीतांचे।
खरं सांगू का, I don't like तुमचं भलं मोठं आणि विकसित वगैरे शहर।
कुठे साधी चावडी नाही न कुठे माणसांची गर्दी. गप्पा बिप्पा तर सोडून द्या ओ। आम्ही तो विषय गौण म्हणू। पण माणसांनी माणसात यायला नको का।
मी माझ्या फोनात अन तो त्याच्या फोनात. खिडकी असते घराला म्हणून बाहेर बघतो तर कुठे पडद्याला सारायला लागतंच की शेवटी। मी माझा पडदा काढेल, फाडुनही टाकेल हो पण समोरच्यानं अलगद सारला तर पाहिजे।
रात्र आता कठीण होत असते अन अचानक मोबाईल वाजतो...
उषःकाल होता होता काळ रात्र झाली,
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली।
गावाकडचा माणूस निळू फुलेंनी काम केलेल्या सिंहासन चित्रपटातील आशा भोसलेंनी गायलेल्या या गीताला धन्यवाद द्यायला हवेत।
एवढंच! बस्स।
अजून काय लिहू.. आठवण कुठे संपते का 😢😢😢
© Vikas Waghamare
Call - 8379977650
सोलापूर
___________________========___________________

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा