बुधवार, २६ एप्रिल, २०१७

अन त्याची आठवण काढत असशील.....😘

दिवस कसे असतात नाही का!
येतात आणि जातात पण कधी सुख - दुखाची ओंजळ आपल्या पदरात देतात कळतच नाही. मात्र त्याचा सुगंध कित्येक दिवस अधिक गडद होऊन दरवळत राहतो.

चांदण्यांनी भरलेलं आभाळ निरव शांततेत बेमालूम बघत राहायचो आपण.
रात्र कशी निपचित असते मधून काजव्यांनी भारलेला आवाज, कोल्हेकुई आणि कुत्र्यांनी केलेला त्रागा. मंद वारा आला की वातावरणाला चार चांद लागायचे. कुणाची उद्याच्या कामाची चर्चा, कुणाची झालेल्या दिवसांवर चर्चा तर कुणी चंदेरी दुनियेत रममाण झालेलं.

एखादं झुडूप शेजारी असलं की मग त्यातून येणारा आवाज हा साक्षात मुरारीरून निघतो असंच वाटायचं. एका ठिकाणी बसून अवघं विश्व प्रवास करून येण्याची ताकद होती त्या चांदण्यात. अगदी कसं लाखोंची दौलत असते न तसं ते आभाळ कित्ती कित्ती प्रेमळ वाटायचं. वाटायचं म्हणजे होतंच.

राजा - राणी, बिरबल वगैरे गोष्टींनी तर या सर्व निरागस व अल्लड वातावरणाला वेगळाच बहर यायचा.

हल्ली चांद आहे न त्याचजागी, चांदण्याची आहेत। आजी असेल कुठे - कुठे अंगाई गाणारी, गोष्टी सांगणारी, थोपटत अलगद झोपवणारी।

पण ती श्रीमंती सर्वांना थोडीच लाभते! आता चांदण्या आणि तो चांद तुझी आठवण काढत असेल आणि तू त्यांची. बस्स......... आठवणींचा लपंडाव म्हण हवं तर!!!

© Vikas Waghamare
8379977650


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा