शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्र पेटला आहे. सर्वत्र केवळ कर्जमाफी द्या, सातबारा कोरा करा असा टाहो फोडताना दिसताहेत. मात्र या राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करा. स्वतः पिकवलेल्या मालाला बाजारभाव द्या. हमीभाव द्या असा डांगोरा म्हणावा तेवढा कुठेही व कुणीही पिटत नाही.
नुकताच मला rushikesh Saknur या मित्राने एक मेसेज केला. परभणीच्या लोहगावात एका शेतकऱ्यांच्या शेतात फिरायला व पाहणी करायला गेलो. ते झिरो बजेट शेती करतात. पंचक्रोशीत नावाजलेला शेतकरी आहे. पाहणी झाली, गप्पा झाल्या, चर्चा झाल्या आणि मग शेतीच्या भावाचा विषय समोर आला तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली. याच सरकारने सांगायचं कि शेतीमध्ये तंत्रज्ञान आणा, नाविन्यपूर्ण संकल्पना मांडा, शेती समृद्ध करा आणि झिरोबजेट शेती करून पिकवलेला माल योग्य भावात विकला जात नाही. कारण काय तर त्याची स्वतंत्र बाजारपेठ नाही. मग शेतकरी जर अजूनहीअशा बाजारपेठांमध्येच भरडला जात असेल तर पुढच्या कित्येक पिढ्या अशाच मागास राहतील.
कर्जमाफी हा मुद्दा वेगळा आहे आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे हा मुद्दा वेगळा आहे. जर खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना अजून बाजारपेठेसाठीच भटकावं लागतंय.
शेतकरी समृद्ध करायचा आहे न मग आता त्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्या।

या वर काही तरी उपाय शोधणे गरजेचेच आहे।
उत्तर द्याहटवाहो नक्कीच। आगामी काळात या सोंगला ठेचला पाहिजे।
उत्तर द्याहटवा