बाप
एका बापानं आयुष्याचा पैका जमवून
बिया पेरल्या बिनबोभाट,
शेत मात्र गहाण राहील आभाळकडं
बापाची लावून वाट.
बाप टांगला गेलाय त्याच शेताच्या बाभळीला
चिमणीचा जीव होऊन,
माय भाकरीला गेलेली अजून शोधतीय
शिवारात फाटक्या चपला पाहून.
खरंतर बापानं इमानदारी दाखवलीय
बेमान शिवाराला,
हिशोब देण्यासाठी गेलेला बाप अजून टांगलाच गेलाय.
पण माय मलाच नध राखते
कदाचित मी आणायला जाऊ नये म्हणून ....
✍कवी- विकास वाघमारे (वाघोलीकर)
📲8379977650
एका बापानं आयुष्याचा पैका जमवून
बिया पेरल्या बिनबोभाट,
शेत मात्र गहाण राहील आभाळकडं
बापाची लावून वाट.
बाप टांगला गेलाय त्याच शेताच्या बाभळीला
चिमणीचा जीव होऊन,
माय भाकरीला गेलेली अजून शोधतीय
शिवारात फाटक्या चपला पाहून.
खरंतर बापानं इमानदारी दाखवलीय
बेमान शिवाराला,
हिशोब देण्यासाठी गेलेला बाप अजून टांगलाच गेलाय.
पण माय मलाच नध राखते
कदाचित मी आणायला जाऊ नये म्हणून ....
✍कवी- विकास वाघमारे (वाघोलीकर)
📲8379977650
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा