शनिवार, ४ मार्च, २०१७

ही गोष्टच निराळी.😂😂😂

#धम्माल_गोष्ट 😂😂
मी आणि माझा भाऊ लहानपणी छोटी सायकल खेळायचो.

मी तसा 2 वर्षांनी मोठा होतो म्हणून थोडा लाड कमीच असायचा मात्र करायचे सुद्धा. लहान भाऊ खूप प्रेमाने वागायचा आणि मिळून मिसळून खायचो, कपडे, खेळणी वगैरे वगैरे.

आई वडील कामाच्या निमित्ताने बाहेर गावी राहायला गेले आम्ही आजीकडे राहिलो. आणि आई-वडील कामाला गेल्यानंतर 25 दिवसांनी किरकोळ कारणाने भावाने माझ्याशी भांडण केले.

त्यानंतर आम्ही बोललो नाही शेजाऱ्याच्या घरी, मित्राकडे बदनामी करायचो दोघेही एकमेकांची. सायकलही कुलूप लावून टाकली होती.

आई वडील आल्यानंतर तरीही आम्ही बोलत नव्हतो. सायकल दोघांच्या पायात बसून होती.

मीच विचार केला या सायकलसाठी कशाला भांडण करायचं आपण मोठे आहोत. म्हणून त्याला सायकल मोठ्या मनाने देऊन टाकली.

त्यानंतर मी पुढेची पाच एक वर्षे कधीच त्याच्या खेळाला हात न लावण्याचं ठरवलं. बाहेर सर्वत्र खेळायचो मित्रांसोबत सर्व खेळ मिळूनच.

छोटा भाऊ मात्र लै खुश व्हायचा. मला घाबरला, कशी फाटली, आपलंच राज्य, तुझी औकात नाही माझी खेळणी खेळायची असं म्हणायचा मी मात्र बालीश आहे म्हणून सायकल देऊन टाकली.

मात्र तो सायकलवर काय करतो, कुठे फिरतो, गैरवापर करतो का याचा तपास घेत असतो.

कधीकधी उगीच एखाद्याच्या नादाला लागून आपली घालवायची कशाला म्हणून काही गोष्टीतून माघार घेतलेली बरी असते!

©Vikas Waghamare

#मुंबईराजकारणविरहित

©भक्तांनो, राजकारणावर न लिहिता काल्पनिक गोष्टी लिहायला मज्जा येते राव.🤓😂


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा