महाराष्ट्र राज्य सार्वजनिक विद्यापीठ विधेयक विधानसभेत एकमताने संमत झाले. विद्यार्थी केंद्रित विधेयाचे सर्वपक्षीय सदस्यांनी स्वागत केले. पुढील वर्षीपासून महाराष्ट्रात खुल्या विद्यार्थी निवडणुका सुरु होण्याची दाट शक्यता आहे. या विद्यापीठ कायद्याचे तमाम विद्यार्थी व संघटनांनी जोरदारपणे स्वागत केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रेट्याने महाराष्ट्रभर नवीन विद्यापीठ कायद्यासाठी मोर्चा, आंदोलन, आणि विद्यार्थी मत लक्षात घेऊन महाराष्ट्र ढवळून काढण्यात आला होता. शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांना सातत्याने निवेदने देऊन हा विषय लावून धरण्यात अभाविप आघाडीवर होती. बाकी पक्ष केंद्रित विद्यार्थी संघटना याबाबत इतकी अनुकुलता दर्शवित नव्हती. मात्र अभाविप याबाबत विशेष लक्ष देऊन प्रकर्षाने सद्यस्थिती मांडत होती.
१९९४ नंतर महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात वेळोवेळी अनेकदा दुरुस्त्या झाल्या मात्र बदल झाला नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. महाविद्यालयातून पुढं येणारं नेतृत्व खुल्या निवडणुका बंद झाल्याने कोमेजून गेलं होतं. भाजपा सरकारने या नवीन विद्यापीठ कायद्याला अधिवेशनात मांडून याबाबत अनुकुलता दर्शविली आहे. आता पुढील वर्षी खुल्या निवडणुकांचे पडघम महाराष्ट्रातील परिसरात वाजतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. विद्यार्थ्यांना उमलत्या नेतृत्वासाठी या निमित्ताने खतपाणी मिळेल. आज जरी हे विधेयक सभागृहात केवळ मंजूर झाले असले तरी येणाऱ्या काही दिवसात यावर सविस्तर चर्चा होऊन सर्व लोकप्रतिनिधींची मते जाणून घेतली जातील. तब्बल २२ वर्षांनी खुल्या निवडणुका सुरु होण्याची एक मोठी आशादायी बातमी या विधेयकामुळे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना मिळाली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या निर्णयाचे व सरकारचे अभिनंदन केले आहे. मात्र अभाविपने दिलेल्या निवेदनातील सर्व घटकांचा त्या विधेयकात समावेश असावा, अशी अपेक्षा विद्यार्थी नेते व्यक्त करीत आहेत. राजकारणातील घराणेशाहीला चाप बसून नवं दमदार नेतृत्व नक्की आगामी काळात पाहायला मिळेल.
✍🏻 विकास विठोबा वाघमारे
📲 8379977650
सोलापूर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा