कोपर्डी बलात्कार घटना सर्वांना माहितेय. उभ्या देशाची झोप उडवणारी हि घटना लोकशाही असलेल्या देशात खूप लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली. कायदा दुबळा झाला. राजकारणाला नवा विषय निर्माण झाला नाहीतर कन्हैय्या पासून वेमुला पर्यंत अन हार्दिक पासून झाडूवाल्या आमच्या अरविंद सर्व विषय आता संपलेत.
काल महाराष्ट्राचे स्वयंघोषित नवनिर्माणकार नेते राजसाहेब ठाकरे कोपर्डी घटना घडली त्या कुटुंबियांना भेट द्यायला गेले होते. गेले ते बरेच झाले नाहीतर जनतेनं माफ केलं नसतं. पण त्याठिकाणी जाऊन जे अकलेचे तारे तोडले त्याने मात्र जनता माफ करेल का ? हे आगामी दिशाच ठरवेल. साहेबांनी तयार केलेली ब्लू प्रिंट सध्या वापरात नाही पण त्यांचे डोकेसुद्धा अलीकडे कुठे (वापरात) दिसत नाही. म्हणून आज थोडे धांधरत बोलले असं दिसतंय.
तर त्यांचे म्हणणे असे होते कि *“ बलात्कारासारखे गुन्हे रोखण्यासाठी शरियत सारखा कायदा लागू करण्याची गरज आहे.”* ऐकलं कि थोडं गरगरलं, *अरे, बाळासाहेब ठाकरेंचा वारस म्हणतात ना हे साहेब स्वतःला. हिंदुत्व हे जर राष्ट्रीयत्व असेल तर मला राष्ट्रीयत्व जास्त मान्य आहे म्हणाले होते न एका सभेत. मग हिंदुत्वाचे गोडवे गाणाऱ्याच्या तोंडी असे काय ऐकतोय हे सुद्धा नवल वाटलं.* पण एक गोष्ट खरी कि या राजसाहेबांच्या वक्तव्यावरून नवनिर्माणाला निघालेली हि जहाज कुठेतरी भलत्याच ठिकाणी भरकटतीय. एक आमदार घेऊन किती दिवस वागणार ? कुणी मिडिया हि अलीकडे कव्हरेज देत नाही, ना आपल्यालाही मुंबई सोडवत नाही मग पक्षही कसा वाढणार ? काही करायचं असेल तर मग आता थोबाड खोलावं लागेल हे मात्र साहेबांनी अचूक हेरलं. बलात्कार करणाऱ्याला कठोरातील कठोर कारवाई झालीच पाहिजे पण हे शरियत काय ? कशाला हवं शरियत ? त्यापेक्षा लाख पटीने शिवाजी महाराजांची न्यायव्यवस्था बरी. साहेब जर शरीयाचे उदात्तीकरण करणार असतील तर मग ओवेसी बरे आपली कशी हि भूमिका उघडउघड सांगतात.
*शरियत याबद्दल साहेबांना माहिती असेलच कि ,*
१)शरियत नुसार जग “अल्लाह” च्या एकाधिकारशाहीवर चालते.
२)या कायद्यात बहुपत्नीत्व मान्य आहे. या कायद्यात नवरा हा पत्नीचा मालक असतो स्त्रीला स्वतःला काही अधिकार नसतात. ती एक वस्तू आहे.
३)पतीने पत्नीला मारायचा अधिकार आहे.
४)पतीने तीन वेळा तलाक म्हटले कि घटस्फोट होतो.
हे सर्व शरियत या कायद्यात येते तर हेच तुम्हाला मान्य आहे का ? तुमची ब्लू प्रिंट नाकारली हे एकाअर्थी बरेच झाले, नाहीतर तुम्हालाच दिशा नाही. आम्हालाही तुमच्या त्या दिशाहीन नवनिर्माणाच्या जहाजात बसवलं असतं.आता विनाकारण विपरीत बुद्धी हि म्हण तुम्हाला लागू पडेल असंच वाटतंय.
पण आता मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत आहेत त्या दृष्टीने तर तुम्ही काही आवाज दिला असेल असं मला वाटत नाही कारण याने नौका तरणार नाही तर खोल बुडेल. पण काही का असेना अलीकडे साहेबांचे *“राज”कारण विनाकारण घसरतंय* हे मात्र खरं.
लेखक✍🏻 - *विकास वाघमारे (वाघोलीकर)* (८३७९९७७६५०)
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा