रविवार, ५ मार्च, २०१७

अन पोलादी आपला माणूस हळवा झाला...

    हजारो नजरा असूसलेल्या, पावसाच्या मंद रिपरीप, ढोलताशांचा गजर, दाटीवाटीत शहरभर लागलेले शुभेच्छाचे होर्डींग, जथ्थेच्या जथ्थे रस्त्याकडे नजर लावून थांबलेले, गुलालाची मुक्त पणे होणारी उधळन हे सारं मनमोहक दृश डोळ्यात साठवत हजारो जनमानसांचा सागर ताटकळत थांबला होता.आपल्या माणसाला मंत्री झाल्यानंतर प्रथमच प्रत्येकाला डोळे भरून पाहायचं होते.तेवढ्यात ८-१० गाडींचा ताफा सायरन वाजवत आला अन मध्यभागी लालदिव्याच्या गाडीतून आपला माणूस उतरला तो म्हणजे आपला माणूस मा.सहकार मंत्री श्री.सुभाष (बापू) देशमुख.आणि हजारो लोकांचा उत्साह द्विगुणीत झाला.प्रत्येकांचा हात ते विलोभनीय दृश टिपण्यासाठी कॅमेराकडे वळला.फटाक्यांच्या आतषबाजीने सारा परिसर दुमदुमून गेला.पुढे मोकळ्या जीपमध्ये आपला माणूस बसला अन हारांची गर्दी,फुलांची उधळण, उत्साह ओसंडून वाहत होता. अश्या जल्लोषाच्या वातावरणात जंगी मिरवणूक पार पडली.

       मंत्री झाल्यानंतर प्रथमच घरी गेलेले बापू जेव्हा आपल्या भगीनीच्या गळ्यात पडले तेव्हा डोळ्यांच्या कडा ओलावल्या, आपला माणूस सर्रकन भूतकाळात गेला.हजारो जनमानसांचा आधार असलेल्या पोलादी माणसाने भगिनीच्या गळ्यात पडून आनंदाश्रुंना वाट मोकळी करून दिली, तेव्हा वातावरण धीरगंभीर झाले. आजही मातीशी नाळ घट्ट असलेला मातीतल्या, मळक्या माणसांचा पोशिंदा किती हळवा झाला यामुळे उपस्थितांची नजर क्षणभर गुंग झाली.साध्या माणसांचा पहाडी नेता यशस्वीतेच्या शिखरावर पोहचला असला तरी भावनेचा काळजातून आलेला हुंदका आवरु शकत नाही हे खर. तेव्हा आमचे “जिंदादिल” लोकनेते सहकार मंत्री असले तरी मातीत पाय रोवून असल्याची साक्ष मनाला किती स्पर्श करून गेली.
#subhash_deshmukh
#आपला_बापू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा