रविवार, ५ मार्च, २०१७

मुख्यमंत्र्यांची संत्री परिवर्तनाची नांदी ठरेल !

   चलन बदलाच्या नंतर सबंध देश आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत असल्याचे अभिमानाने सांगतो आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस राज्यातील समस्त जनतेच्या सोबत असल्याचे सांगत आहेत. केवळ सोबत नाहीतर आज साक्षात पेटीएमने संत्री खरेदी केली. काळानुसार बदल जनता स्वीकारते मात्र काही समाजातील तथाकथित महाशयांना या बदलाला सामोरे जाताना प्रचंड भय मनात दाटते आणि मग केविलवाणी धडपड जनतेच्या आडून सुरु होते, हे दुर्दैवच. संत्रीला भाव नाही म्हणून आंदोलन करणारे आंदोलक मुख्यमंत्र्यांनी संत्री घेतल्याने सुखावले. त्यांच्या आंदोलनाला पाठ दाखवली नाही की गाडीत बसून पळ काढला नाही. उलट त्यांची भेट घेऊन २०० रुपये किलोप्रमाणे अडीच किलो संत्री खरेदी करून विरोधकांना त्याची फोड खायला दिली.
          कॅशलेसचा डांगोरा पिटत असताना चौफेर टीका झेलत प्रचंड परिवर्तन आज देशभरात सुरू आहे. हा बदल केवळ पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी योजलेला बदल नाही, हा बदल केवळ मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केलेला बदल नाही तर हा बदल सामान्य जनतेने सांगितल्या प्रमाणे सरकार कार्यवाही करत आहे. म्हणजे हा बदल सामान्य नागरिकांनी घडवून आणलेला बदल आहे. नेमकं सरकार आजपर्यंत सामान्यांच्या प्रश्नाकडे, मागण्यांकडे डोळेझाकपणे पाहत होतं. तोच बदल सत्तापरिवर्तन झाल्याने भाजपा सरकारने घडवून आणला आहे. हे सरकार धनदांडग्यांचे नाही तर गरिबांचे आहे हे ठासून सांगत असणारे श्री. फडणवीस असोत किंवा श्री. मोदिजी नोटाबंदीच्या निर्णयाने हे जनतेने पाहिलं आहे. आजची संत्री खरेदी हा स्टंट नाही तर हि सुरुवात आहे. बदल घडलेल्या नव्या पर्वाची... बदल स्वीकारत असलेल्या जनसामान्यांची... आणि समृद्ध महाराष्ट्रासह समृध्द देशाची. आता देश डिजिटलच्या दिशेने निघाला आहे. महाराष्ट्र डिजिटल होतो आहे. आजची मुख्यमंत्र्यांनी केलेली पेटीएम खरेदी हि झोकून देण्याच्या मार्गाने केलेले मार्गाक्रम आहे. पण यातून एक खरं की विरोधकांनी चलन बदलाच्या निर्णयाने तोंड आंबट केले असले तरी संत्री खाऊन थोडे बहुत खुश होतील कारण ती संत्री परिवर्तनाची नांदी ठरणार आहे.

                 *✍🏻 विकास विठोबा वाघमारे*
                *📲8379977650*
                *सोलापूर*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा