महाराष्ट्राचे आदरणीय शिक्षणमंत्री विनोदजी तावडे साहेब आपल्याला माहिती आहे विद्यार्थी नेतृत्व काय काय करू शकते . एव्हाना आपणच प्रसंगी हे सर्व केलेलं आहे . आता आपण राज्याचे शिक्षण मंत्री आहात, आम्ही गेली दोन वर्षे सातत्याने स्नेहपूर्ण वातावरणात आपल्याला भेटून नवीन विद्यापीठ कायद्याच्या बाबतीत अग्रणी भूमिका घ्या व या अधिवेशनात कायदा पारित कराच असा आग्रह धरला होता. वारंवार आपण "तारीख पे तारीख" दिली आम्ही मात्र त्या दिवसाची चातकासारखी वाट पाहत आहोत. सत्तेत आल्यापासून 3 अधिवेशने संपली पण आपण त्यावर शब्दही बोलायला तयार नाहीत. हे वागणं बरं नव्हे हे सुद्धा आम्ही सांगितलं विद्यार्थी हिताचा कायदा आणण्यासाठी एवढा उठाठेव आम्हाला करावा लागतोय पण यासाठी उद्या रस्त्यावर उतरून आम्ही आपल्या लक्षात आणून देऊच पण अधिवेशनाला अजून काही दिवस शिल्लक आहेत लवकरात लवकर सभागृहात विषय मांडा. नाहीतर हि विद्यार्थी चळवळ उद्या आपण महाराष्ट्रभर फिरणार आहात त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसेल. याचा रोष आपल्याला पाहायला मिळेल. सुखाने महाराष्ट्रात फिरू देणार नाही मग मात्र आपण छात्रचळवळ लक्षात येईल त्यापूर्वी तातडीने हा कायदा आणा. याच वर्षी पासून विद्यार्थी परिषद खुल्या निवडणूका सुरु करा. परवाच आपण सांगितलं की पुढच्या वर्षी सुरु करू. आता आश्वासन खूप ऐकली आहे कार्यवाही गरजेची आहे हे तमाम छात्रशक्ती आपल्याला सांगतीय. आपल्या जीवनात गेली 3 वर्षे पुढचं वर्षे कधी येतं? याची कल्पनाच आम्हाला येत नाही आहे. सतत तेच ऐकून आम्ही शांत होतो. आता आपण तातडीने विषयाला हात घाला म्हणजे पुढचे कोणतेही जनआंदोलन आपल्याला पाहायला मिळणार नाही. महाविद्यालयातील नेतृत्वाला आपण अश्याप्रकारे दाबू पाहत आहात काय? असा प्रश्न आम्हा विद्यार्थ्यांच्या मनात येतोय.
- विकास वाघमारे (वाघोलीकर)
8379977650
#vinod_tawade
#Evacuation_minister
#abvp_maharashtra #abvp_solapur
- विकास वाघमारे (वाघोलीकर)
8379977650
#vinod_tawade
#Evacuation_minister
#abvp_maharashtra #abvp_solapur
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा