काल एक बाप भेटला. लेकीचा संसार अडकीत्यात असल्याचं सांगत होता. प्रत्यक्ष पत्र वाचलं अन क्षणभर डोकं बंद झालं.
गावाकडचा मळकट बाप लेकीच्या सोन्याचा संसार व्हावा हे स्वप्न पाहून कर्णीधरनी भरमसाठ दिली. घर वगैरे पॉश, बंगला, चारचाकी गाडी, नोकरी अन अगदी राजेशाही घराणं. लग्नाला कर्ज काढून सर्व छान केलं. मात्र लग्न झाल्यानंतर हे मुलीचं सासरच सर्व खोटं निघालं. ना नोकरी ना गाडी ना शेती घर मात्र टोलेजंग.
मी विचारही करू शकत नाही असं वास्तव त्या बापानं सांगितलं. दररोज दारूच्या डोहात बुडणारा जावई मुलीला विचार करण्याची पलीकडे मारहाण करतो.
बंगला आहे मात्र आज मुलगी कोंबड्याच्या खुराड्यात एका लुगड्याचा पडदा लावून जगते आहे. दोन-तीन दिवस जेवण मिळत नाही. तशातही पैशासाठी बेफाम मारहाण सुरूच.
बापाला हुंदका दाटून येत होता. व्यवस्था कोणतीही दाद देत नाही. कुणीही गरिबांचा वाली नाही हे शब्द थेट काळजाला वार करत हॊते.
हाताच्या फोडावानी सांभाळलेली पोर आता खाटकाच्या दावणीला बांधली. किती भयाण जग आहे.
प्रेम, आपुलकी, माया, ममता आणि सर्व या जगात हरवत जातंय. आपण किती सुखात आहोत याची जनिव होते नि त्यांच्या परिस्थितीचा स्पर्श झाला की सर्व मीपण क्षणात गळून पडतो अन भीती वाटते या जगाची.
© Vikas Waghamare

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा