पांढऱ्या फक्क माळावरून
बाप सहल करतो जीवाची,
गुर- ढोर अन बाप गुमान फिरतात
पावसाच्या गप्पा करत.
मी कवा- बवा जातो
पांढऱ्या माळावर स्टारचा कुर्ता घालून,
तेव्हा बाप नटतो कि
साहेब झाल्याच्या नादानं.
सिटी मधून व्हिलेज आता
मला ही अंधुक दिसतंय,
कवा-बवा जाईन मी
त्यांच्या पांढऱ्या माळाची अन भाळाची तक्रार ऐकायला.
पण या सिटी मधून मला आता ते व्हिलेज दिसत नाही म्हणून वाट आठवतोय.....
विकास वाघमारे (वाघोलीकर)
(८३७९९७७६५०)
बाप सहल करतो जीवाची,
गुर- ढोर अन बाप गुमान फिरतात
पावसाच्या गप्पा करत.
मी कवा- बवा जातो
पांढऱ्या माळावर स्टारचा कुर्ता घालून,
तेव्हा बाप नटतो कि
साहेब झाल्याच्या नादानं.
सिटी मधून व्हिलेज आता
मला ही अंधुक दिसतंय,
कवा-बवा जाईन मी
त्यांच्या पांढऱ्या माळाची अन भाळाची तक्रार ऐकायला.
पण या सिटी मधून मला आता ते व्हिलेज दिसत नाही म्हणून वाट आठवतोय.....
विकास वाघमारे (वाघोलीकर)
(८३७९९७७६५०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा